सिमला : हिमाचलप्रदेशात थंडीची लाट आलीय. शिमल्या सर्वदूर बर्फाचं साम्राज्य पसरलंय. रस्ते निसरडे झाल्यानं गाड्या चालवताना काळजी घ्यावी लागतेय. निसरड्या रस्त्यांमुळे वाहतुक कोंडीचाही सामना करावा लागतोय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही ठिकाणी पावसाची किंवा बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलीय. पुढच्या चार दिवसांत असेच वातावरण राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. डोंगराळ भागात सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. 


या भागांमधलं तापमान उणे 18 अंशांपर्यंत जाण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवलीय. मनालीमध्ये सध्या उणे 6.8 अशं सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलीय. काही ठिकाणी पाण्याच्या पाईपांमधलं पाणीही गोठलंय. त्यामुळं पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागतोय.