उत्तर भारतात थंडीची लाट कायम
उत्तर भारतात आलेली थंडीची लाट पुढचा आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
नवी दिल्ली : उत्तर भारतात आलेली थंडीची लाट पुढचा आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
दिल्ली, पंजाब, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार, आणि ओडिशाच्या काही भागात दाट धुकं पसरलेलं असेल असंही हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. या धुक्यामुळे उत्तरेत जाणाऱ्या सगळ्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
उत्तरेकडील कडक्याच्या थंडीनं आता राज्यातही थंडीचा कडाका वाढत जाईल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तरप्रदेश या परिसरात आठवड्याच्या उत्तरार्धात थंडी आणखी वाढेल असा अंदाज आहे.