कोलकाता : कोलकाता एअरपोर्टवर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल, यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न झाला. उर्जित पटेल यांना एअरपोर्टवर, काळे झेंडे दाखवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोटाबंदीविरोधात घोषणा दिल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी कार्यकर्त्यांना उर्जित पेटल यांच्यापासून दूर ठेवलं. मात्र कार्यकर्त्यांनी नोटाबंदीचा विरोध काळे झेंडे दाखवून व्यक्त केला.


उर्जित पटेल एअरपोर्टवर पोहचताच कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ते कारमधून उतरताच कार्यकर्ते त्यांच्यावर धावून गेले. मात्र पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वेळीच रोखलं. नोटाबंदीला विरोध असल्याने कार्यकर्त्यांकडून असं आंदोलन केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.