`अफजल गुरु जी`...हे काय बोलले काँग्रेस नेते ?
जेएनयूमध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या.
नवी दिल्ली: जेएनयूमध्ये संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. त्यावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. या प्रकरणावरून राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी अफजल गुरचा उल्लेख 'अफजल गुरु जी' असा केला.
या मुद्द्यावरून पुन्हा वाद होईल हे लक्षात आल्यावर, सुरजेवाला यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी वीस वेळा अफजल गुरुचं नाव घेतलं, त्यातल्या फक्त एक वेळा मी अफजल गुरु जी म्हणालो, पण ही चूक अनावधानानं झाली असल्याचं स्पष्टीकरण सुरजेवाला यांनी दिलं आहे.