इंदूर संघाच्या कार्यालयावर तिरंगा फडकविण्यासाठी गेले काँग्रेस कार्यकर्ते, स्वयंसेवकांनी केले स्वागत
जेएनयू वादाचे पडसाद देशभरात पडत आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते इंदूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय `अर्चना` येथे तिरंगा फडकविण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी एक अद्भूत चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी तिरंगा फडकविण्यास आलेल्या स्वयंसेवकांचे जोरदार स्वागत केले.
इंदूर : जेएनयू वादाचे पडसाद देशभरात पडत आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते इंदूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय 'अर्चना' येथे तिरंगा फडकविण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी एक अद्भूत चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्वयंसेवकांनी तिरंगा फडकविण्यास आलेल्या स्वयंसेवकांचे जोरदार स्वागत केले.
असे झाले काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्वागत
मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरूण यादव आणि आमदार जीतू पटवारी हे संघ कार्यालयात तिरंगा फडकविण्यासाठी गेले त्यावेळी त्याचे स्वागत स्वयंसेवकांनी गंध लावून केले. त्यानंतर यादव यांनी संघाच्या भगव्या झेंड्यासोबत तिरंगा फडकविला. या वेळी काँग्रेस नेत्यांसह संघाचे काही अधिकारी उपस्थित होते. यावेळी संघाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना चहा नास्ताही दिला.
पोलिसांनी नाही दिली होती परवानगी
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संघ कार्यालयात जाऊन तिरंगा फडकविण्याची परवानगी दिली नव्हती. यादव याच्या नेतृत्त्वखाली ८०० कार्यकर्ते संघाच्या कार्यालयात गेले होते. पण संघाच्या स्वागताने ते आश्चर्यचकीत झाले होते.