नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल बिपीन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख बनणार आहेत. ते दलबीरसिंग सुहाग यांची जागा घेतील. येत्या 31 डिसेंबरला दलबीरसिंग सुहाग निवृत्त होत आहेत.


बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती. मात्र रावत यांच्या नियुक्तीवरुन नव्या वादाला तोंड फुटलंय. काँग्रेसने रावत यांच्या नियुक्तीवर सवाल उपस्थित केलेत.. तीन वरिष्ठ अधिका-यांना डावलून बिपीन रावत यांची नियुक्ती कशी करण्यात आली असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे. मात्र काँग्रेसचे हे आरोप सरकारने फेटाळलेत. बिपीन रावत यांची योग्य प्रक्रियेनुसार झाल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.