काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना कोर्टाचा दणका
महात्मा गांधींच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना दणका दिलाय. त्यांना यापुढे प्रत्येक सुनावणीवेळी भिवंडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे.
नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या हत्येबाबत केलेल्या वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना दणका दिलाय. त्यांना यापुढे प्रत्येक सुनावणीवेळी भिवंडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे.
त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला चालवला जाणार असून यापुढच्या प्रत्येक सुनावणीवेळी त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
24 ऑगस्टला राहुल गांधी यांनी गांधींची हत्या RSS संबंधितांकडून झाली असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर त्यांनी त्यांचं वक्तव्य बदललेही होतं