पणजी : काँग्रेसचे माजी आमदार विश्वजीत राणे अखेर आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. गोवा भाजपने ही माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वजीत राणे हे बिनशर्त पक्षात प्रवेश करत असल्याची माहिती भाजपचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी दिलीय. एका वेबसाईटच्या माहितीनुसार विश्वजीत राणे यांनीही या बातमीला दुजोरा दिलाय. 


गोवा विधानसभा निवडणुकीत वालपोई या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर विश्वजीत राणे यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.काँग्रेसच्या 17 आमदारांपैकी विश्वीजीत राणे मतदानावेळी गैरहजर राहिले होते. व्हिप डावलून त्यांनी अप्रत्यक्षरित्या मनोहर पर्रिकरांना मदत केली होती.


राणे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचे चिरंजीव आहेत.