`काँग्रेस घोडेबाजाराविरोधात लोकशाही मार्गाने लढणार`
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला आहे. पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी, उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेसाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. उत्तराखंडमध्ये जनतेने निवडून दिलेल सरकार पाडण्यासाठी भाजपने घोडेबाजार चालवला आहे. पैसा आणि मसल पॉवरचा गैरवापर सुरु आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
नरेंद्र मोदींच्या भाजपचा खरा चेहरा उत्तराखंडमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे उघड झाला आहे. काँग्रेस याविरोधात लोकशाही मार्गाने लढेल असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या विरोधात, उत्तराखंडमधल्या काँग्रेसच्या ९ आमदारांनी बंड पुकारलं आहे. राज्यपालांनी हरीश रावत यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी २८ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.