लखनऊ : बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालन ही उत्तर प्रदेश सरकारच्या समाजवादी पेन्शन योजनेची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहे. या योजनेच्या जाहिरातीमध्ये विद्या बालननं घातलेल्या साडीवरून आता राजकारण सुरु झालं आहे. विद्या बालननं घातलेली साडी आणि समाजवादी पक्षाच्या झेंड्याचा रंग सारखाच आहे. समाजवादी पक्ष सरकारी योजनांचा वापर पक्षाच्या प्रचारासाठी करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. 


समाजवादी पक्षानं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणीही कोणत्याही रंगाची साडी घालू शकतं, असं प्रत्युत्तर समाजवादी पक्षाचे नेते आणि मंत्री रवीदास मेहरोत्रांनी दिलं आहे.