रेल्वेतील प्रवासादरम्यान त्यांनी बांधली लग्नगाठ
ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एका तरुण-तरुणीचे सूत जुळले. त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी लग्नही केले. एखाद्या सिनेमातील कथा वाटावी अशीच ही कहाणी आहे. मात्र ही कहाणी खरोखर एका ट्रेनमध्ये घडलीये.
नवी दिल्ली : ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान एका तरुण-तरुणीचे सूत जुळले. त्यांच्यात प्रेम झाले आणि त्यांनी लग्नही केले. एखाद्या सिनेमातील कथा वाटावी अशीच ही कहाणी आहे. मात्र ही कहाणी खरोखर एका ट्रेनमध्ये घडलीये.
दिल्लीवरुन प्रवासासाठी निघालेल्या एका ट्रेनमध्ये एक तरुण आणि तरुणी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांची ओळख झाली. ओळखीनंतर गप्पा सुरु झाल्या. ट्रेन गाझियाबादमध्ये पोहोचेपर्यंत या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले.
इतकेच नव्हे तर अलीगढ येथे पोहोचताना त्यांनी चक्क लग्नही केले. ही शॉर्ट लव्हस्टोरीची कहाणी लगेचच ट्रेनमध्ये इतकी व्हायरल झाली की टुंडला स्टेशनवर या जोडप्याची शॉर्ट लव्हस्टोरी ऐकण्यासाठी मीडियाचीही गर्दी झाली.
मीडियाची गर्दी पाहून तो तरुण घाबरला मात्र त्या तरुणीने न घाबरता मीडियाला शॉर्ट लव्हस्टोरीची कहाणी सांगितली.