दही हंडी उत्सवात मुलांना सामील करण्यावर १७ ऑगस्टला निर्णय
दही हंडीची उंची २० फूटपेक्षा जास्त ठेवण्यावर आणि त्यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना समाविष्ट करण्याला मंजुरी मिळू शकते.
नवी दिल्ली : दही हंडीची उंची २० फूटपेक्षा जास्त ठेवण्यावर आणि त्यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना समाविष्ट करण्याला मंजुरी मिळू शकते.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाला कायम ठेवण्याचे संकेत दिले आहे. दरम्यान कोर्टाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर १७ ऑगस्ट रोजी निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे.
२०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाचा अंतरीम आदेश
२०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्टे आणला होता. हायकोर्टाने दही हंडीची उंची २० फूटपेक्षा जास्त ठेवण्यावर आणि त्यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना समाविष्ट करण्याला बंदी घातली होती. १४ ऑगस्ट २०१४ रोजी सुप्रीम कोर्टाने आदेशात एक अंतरीम आदेश दिला होता. जन्माष्टमी जवळ असल्यामुळे त्यावेळी हा देण्यात आला होता.
त्यानंतर सविस्तर आदेश न देता सुनावणी संपवली होती. त्यानंतर संभ्रम होता की सुप्रीम कोर्टाचा अंतरीम आदेश जारी आहे की हायकोर्टाचा आदेश मानणे जरूरी आहे.