नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे,  'देशात दलित समुदायावर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ भाजपमधील सर्व दलित खासदारांनी पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दलितांसाठी मंदिरांची दारे बंद केली गेली, तर ते चर्च, मशिदीमध्ये जातील आणि त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही, अस भाजप खासदार उदित राज म्हटलं होतं. तसेच तथाकथित रक्षणकर्त्यांमुळेच हिंदुत्व धोक्‍यात असल्याचे वक्तव्यही भाजप खासदार उदित राज यांनी केलं होतं.


केजरीवाल यांनी याच वक्तव्याचा आधार घेत म्हटलंय, 'उदितजी आणि भाजपच्या सर्व दलित खासदारांनी देशभरात भाजपच्या गुंडांकडून दलितांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात राजीनामा दिला पाहिजे. 


भाजपचे दलित नेते आणि खासदार दलितांची लढाई लढण्याची इच्छा बाळगत असतील किंवा दलितांचा उद्धार व्हावा, असे त्यांना वाटत असेल, तर याचा जाब विचारावा. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दलितविरोधी आणि मनुवादी असल्याचं २ वर्षांत  स्पष्ट झाले आहे, असे आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष यांनीही भाजपवर टीका करताना म्हटले आहे.