नवी दिल्ली : नौदलाच्या स्कॉर्पिन या अत्याधुनिक पाणबुडी प्रकल्पाची गोपनीय माहिती फुटल्याची पुढे आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सची पाणबुड्या बनवणारी कंपनी डीसीएनएसकडे या पाणबुडीची महत्वाची कागदपत्र होती. त्यात पाणबुडीच्या संरक्षण यंत्रणा आणि मारक क्षमतेशी संबंधित महितीचाही समावेश आहे.  डीसीएनएसच्या माध्यमातून भारताच्या सहा नव्या पाणबुड्यांची बांधणी सुरू आहे. 


याविषयीची जवळपास 22 हजार 400 पानी माहिती लीक झाल्याचं पुढे आलंय. त्यात पाणबुड्यांमध्ये शत्रूची माहिती गोळा करण्याचा कालवधी, वेगात प्रवास करताना या पाणबुड्यांमधून किती आवाज येतो, या पाणबुड्या किती अंतरावरील लक्ष्य भेदू शकतात, अशी अत्यंत गोपनीय महिती लीक झाल्याचं एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रानं प्रसिद्ध केले आहे. 


मध्यरात्री बाराच्या सुमारास झालेली घटना संरक्षण मंत्री पर्रिकरांना कळवण्यात आलीय. त्यावर तातडीनं चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं पर्रिकरांनी स्पष्ट केलंय.  डीसीएनएसच्या माध्यमातूनच ही माहिती फुटल्याचं पुढे आलंय. त्यामुळे त्यात भारतीय यंत्रणांच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह नसल्याचंही स्पष्ट आहे.  


शिवाय पाणबुड्यांची 100 टक्के माहिती फुटली नसून अनेक महत्वाच्या गोष्टी अजूनही भारतीय नौदलाकडेच आहेत, असेही मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे.