उदयपूर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम त्याच्या मागच्या अटी मान्य झाल्या तर भारतात यायला तयार आहे, असं वक्तव्य दाऊदचे वकील श्याम केसवानी यांनी केलं आहे. याबाबत दाऊदशी बोलावं लागेल अशी प्रतिक्रियाही केसवानींनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येऊ नये अशी मागणी पाच वर्षांपूर्वी दाऊदनं केली होती, पण त्यावेळच्या मनमोहन सरकारनं याकडे गांभिर्यानं बघितलं नाही, असा आरोप केसवानींनी केला आहे. दाऊदची काही माणसं लंडनमध्ये राम जेठमलानींना भेटली होती आणि दाऊदला आर्थर रोडमध्ये न ठेवण्याची अट त्यांनी ठेवली होती असंही केसवानी म्हणालेत.


फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये अशी अबू सालेमनं मागणी केली होती, सरकारनं ही मागणी मान्य केली. छोटा राजननंही त्याला तिहाड जेलमध्ये ठेवावं अशी मागणी केली होती, तेव्हा सरकारनं त्याला सीबीआयच्या बंगल्यात ठेवलं. सरकार दुसऱ्यांच्या अटी मान्य करतं, पण आर्थर रोड जेल मध्ये न ठेवण्याची आणि सुरक्षेची हमी देण्याची दाऊदची अट सरकार मान्य करत नाही, यामागे वेगळी कारणं असल्याचा आरोपही केसवानींनी केला आहे.