दयाशंकर सिंग यांना मायावतींवर शेरेबाजी प्रकरणी अटक
भाजपचे माजी नेते दयाशंकर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दयाशंकर यांच्यावर बसप अध्यक्षा मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने बिहारमध्ये दयाशंकर यांना बेड्या ठोकल्या आहेत.
पाटणा : भाजपचे माजी नेते दयाशंकर सिंह यांना अटक करण्यात आली आहे. दयाशंकर यांच्यावर बसप अध्यक्षा मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्याचा आरोप आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने बिहारमध्ये दयाशंकर यांना बेड्या ठोकल्या आहेत.
दयाशंकर सिंग यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर ते परागंदा झाले होते. त्यानंतर झारखंडमधील प्रसिद्ध शिव मंदिरात ते पूजा करताना दिसले होते. बक्सरमधल्या शुगर मिल कॉलनीमध्ये सिंग यांना अटक करण्यात आली.
दयाशंकर सिंग बालपणी बक्सरमध्ये राहायचे, तर त्यांचं शिक्षण उत्तर प्रदेशात झालं होतं.मायावती यांच्यावर अश्लील शेरेबाजी केल्यानंतर भाजपने त्यांना पक्षाच्या उत्तर प्रदेशच्या उपाध्यक्षपदावरुन हटवलं होतं.