नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर केंद्राकडून मुख्यमंत्र्यांच्या शिष्टमंडऴाला मदतीबाबत कोणतंही ठोस आश्वासन मिळालेलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जमाफीबाबत केंद्रानं योजना तयार करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींसमोर केली. त्यावर शेतकऱ्यांना क्रेडिट सिस्टममध्ये आणण्याचं आश्वासन जेटलींनी दिलं.


31 लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतलंय. या कर्जाची रक्कम 30 हजार 500 कोटी एवढी आहे. शेतकरी क्रेडिट सिस्टमच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळं ते पुन्हा कर्जबाजारी होतील. त्यामुळं केंद्रानं योजना तयार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केलीय.


सेनेची भूमिका


या बैठकीला उपस्थित असलेल्या शिवसेना मंत्र्यांचे मात्र समाधान झालेलं दिसत नाही. योजना नको शेतकऱ्यांना कर्जमाफीच हवी असल्याची ठाम भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. उद्धव ठाकरेंना बैठकीसंदर्भात माहिती देणार असून तेच आता अर्थसंकल्प मांडू द्यायचा की नाही ते ठरवणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.