नवी दिल्ली : दिल्ली भाजप अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानावर काही व्यक्तींनी हल्ला केलाय. रविवारी रात्री तिवारी यांच्या घरासमोर झालेल्या एका अपघातानंतर ही घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास दहा जणांनी आपल्या घरावर हल्ला केल्याचा आरोप तिवारी या्ंनी केलाय. 159-नॉर्थ एव्हेन्यू या तिवारी यांच्या निवासस्थानी हा हल्ला झालाय. हा हल्ला झाला त्यावेळी मनोज तिवारी घरी नव्हते. त्यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ कार आणि वॅगन-आर कारमध्ये धडक झाली. 


या अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये हमरीतुमरी झाली. त्यानंतर मनोज तिवारी यांचा स्टाफ घरी परतला. मात्र वॅगन-आर कारमधील व्यक्ती जे तिवारी यांच्या जवळ राहतात त्यांनी अन्य काही जणांना बोलावून तिवारी यांच्या घरावर हल्ला केला. 


यावेळी या व्यक्तींनी तिवारी यांच्या स्टाफलाही मारहाण केलीय. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मारहाण करणा-या सगळ्या व्यक्तींची ओळख पटली असून चार जणांना अटक करण्यात आलीय. या हल्लेखोरांना पोलिसांचीही साथ होती असा गंभीर आरोप खासदार मनोज तिवारींनी केलाय.