दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार
एका २३ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करुन फेकून देण्यात आलं. दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या सनलाईट परिसरात ही घटना घडली.
नवी दिल्ली : एका २३ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करुन फेकून देण्यात आलं. दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या सनलाईट परिसरात ही घटना घडली.
ही तरूणी निझामुद्दीन भागातील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती, ३ तरुणांनी लिफ्ट देण्याची ऑफर दिली. मी नकार दिल्यानंतर त्यांनी बळजबरी करत माझे अपहरण केले आणि गाडीमध्ये माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी मला सनलाईट परिसरातील पुलाजवळ गाडीतून फेकून दिले, असं या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
या तरुणीने गाडीचा नंबर सांगितला यावरून,पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या दोघांवरही अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे.