नवी दिल्ली :  चित्रपटात कलाकार म्हणून काम करण्याच्या इच्छेने एका मॉडेलचं आयुष्य उध्वस्थ करण्यात आलं. दिल्लीमध्ये राहणारी ही मॉडेल चित्रपटात हिरोइनचं काम मिळणार या आशेने तिला पुण्यात बोलवलं आणि तिथे बोलवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
 

 कशी आली पुण्यात...



आता तुम्ही विचार केला असेल, की ही मॉडेल तिथपर्यंत कशी पोहचली?
तर हिरोइनचं काम मिळणार ह्या आशेने मॉडेलची मैत्री फेसबूकवर एका व्यक्तीबरोबर झाली. त्या व्यक्तीने ह्या मुलीला चित्रपटात काम मिळणार असं सांगून तिला मार्च मध्ये पुण्यात बोलावलं. मुलगी पुण्यात पोहचल्यानंतर आरोपीने तिला दुसऱ्या एका व्यक्तिशी बॉस म्हणून तिची गाठ घालून दिली. मग तिच्यावर शारीरिक संबध ठेवण्यास सक्ती केली. 

 

 

सिगारेटचे दिले चटके....



एवढचं नाही तर त्या नराधामांनी त्या पीडित मुलीच्या पूर्ण शरीरावर सिगारेटचे चटके देण्यात आले. त्या पीडित मुलीने संबधात येण्यापासून नकार दिल्याने तिला सिगारेटचे चटके आणि तिला मारण्यात आलं. नंतर त्या चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.असं सांगितलं जातयं की तिच्या एका मैत्रिणीद्वारे तिने तिथून सुटका करून घेतली.

 


दिल्लीत एका हॉस्पिटलमध्ये ती पोहचली आणि मग त्या हॉस्पिटलमधूनचं पोलिसांना ह्या सर्व प्रकाराबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी पीडित मुलीचा  संपर्क करुन हा प्रकार रजिस्टर करण्यात आला.  मग त्या तीन नराधामांना अटक करण्यात आलं. पण अजूनं चौथा फरार आहे. पोलिसांचा तपास चालू आहे.