मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी हायकोर्टाने झटका दिला आहे. दिल्ली हाईकोर्टाने या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी आयकर विभागाला दिली आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भागीदारी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने भाजपचे खासदार सुब्रमण्यन स्वामी यांची याचिका फेटाळली होती. ज्याच्या माध्यमातून स्वामींनी काँग्रेस आणि एसोसिएट जर्नल लिमिटेड म्हणजेच एजेएलच्या अकाउंट आणि बॅलेंस शीटची माहिती मागितली होती. यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिलासा मिळाला असं म्हटलं जात होतं.


नॅशनल हेराल्ड प्रकरणात डिसेंबर 2015 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांना पटियाला हाऊस कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर त्यांनी जामीन देखील मिळाला होता. सुब्रमण्यम स्वामींनी याचा विरोध करत म्हटलं की दोघांना जामीन मिळाला तर ते देश सोडून पळून जातील. यानंतर जून 2016 मध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळेल असं वाटत होतं पण दिल्ली हायकोर्टाने पुन्हा एकदा झटका दिला आहे.