नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने सीमेवर बीएसएफ जवानांना खराब गुणवत्तेचं जेवन पाठवल्याचा आरोप झाल्यानंतर गृह मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफ जवानांना खराब प्रतीचं जेवन पाठवल्याने एक याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने गृह मंत्रालय आणि पॅरामिलिट्री फोर्सेजला देखील नोटीस पाठवली आहे.


बीएसएफ जवान तेज बहादुरने व्हिडिओ शेअर केल्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यावरुन देशभरात चर्चा रंगू लागली. वरिष्ठ अधिकारी जवानांना चांगल्या दर्जाचं जेवन देत नसल्याचा आरोप जवानाने केला होता. या प्रकरणात पीएमओनेही रिपोर्ट मागितला होता. 


सरकारद्वारे दिलं जाणारं राशन आणि इतर वस्तू जवांनासाठी पाठवले जाते पण काही मोठे अधिकारी हे विकतात असा गंभीर आरोप या जवानाने केला होता. गृह मंत्रालयानेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.