नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातल्या विधानसभा निवडणूकीत जोरदार कामगिरी केल्यावर आता भाजपनं दिल्ली महापालिकेवर पुन्हा वर्चस्व स्थापन केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपनं आपली सत्ता राखण्यात यश मिळवल्याचं चित्र आहे. दिल्ली मनपाच्या 270 जागांपैकी 256 जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैंकी तब्बल 180 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. 


उत्तर दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्ली अशा महापालिकेच्या तिन्ही विभागांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारलीय. पूर्व दिल्लीत 63 पैकी 60 जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैंकी तब्बल 38 जागांवर भाजप पुढे आहे. तर दक्षिण दिल्लीतल्या 104 जागांपैकी 70 ठिकाणी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. 


तिकडे उत्तर दिल्लीत भाजपच्या उमेदवारांना 68 ठिकाणी आघाडी मिळालीय.  दुसऱ्या स्थानी काँग्रेस तर विधानसभेत सत्तेवर असणाऱ्या आम आदमी पक्षाला जोरदार हादरा बसलायच.केजरीवालांच्या पक्षाचे उमेदवार 34 जागांवर आघाडीवर आहेत.