सरकारी कर्मचाऱ्यांना रोख पगार देण्याची मागणी
५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर अनेकांना पैशांची अडचण येत आहे. बँकेतून पैसे काढतांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अजून अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून गोवा सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार रोख द्यावा अशी मागणी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई : ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर अनेकांना पैशांची अडचण येत आहे. बँकेतून पैसे काढतांना मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अजून अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून गोवा सरकारने कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचा पगार रोख द्यावा अशी मागणी केली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबररोजी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. १० नोव्हेंबरपासून देशभरातील विविध बँकांमध्ये पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बदलून घेण्याचे काम सुरु झाले आहे. नवीन नोटा आणि शंभरच्या नोटांचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. काही दिवसात परिस्थिती सामान्य होईल.
गोव्यातील सरकारी कर्मचारी संघटनेने जॉन नाझारेथ यांनी गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना एक पत्र पाठवून ही मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून त्यांनी ही मागणी केली आहे.