नवी दिल्ली : 500 आणि 1000 नोटांच्या बंदी नंतर पैसै काढण्यासाठी सामान्यांचे हाल होत आहे. बॅंक आणि एटीएमसमोर रांगाच रांगा दिसत आहे. कडक उन्हामुळे काहींना आपले प्राण गमवावे लागलेत. आता अशाच स्थितीत एक चांगली बातमी कानी आलेय. पुढील आठवडाभरात अधिकाधिक एटीएममध्ये 500 आणि 2000च्या नोटा मिळू शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील आठड्यानंतर देशभरातील निम्म्या एटीएममध्ये 500 आणि 2000 च्या नव्या नोटा मिळणार आहेत. सध्या देशभरात बँका, एटीएम, टपाल कार्यालयांच्या बाहेर रांगा आहेत. केवळ बॅंकेत 500 आणि 2000च्या नोटा उपलब्ध होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे. 


आठवड्याभरात एटीएम मशीनमध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर देशातील निम्म्या एटीएममधून 500 आणि 2000च्या नव्या नोटा मिळू लागतील, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. दरम्यान, मोदींनी 50 दिवसांची मुदत मागितली आहे.