नवी दिल्ली : दान आणि देणगी स्वरूपात जमा होणाऱ्या चलनी नोटा, नाणी त्याच दिवशी संबंधित बँकांमध्ये भरावे लागणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सर्व देवस्थाने व धर्मादाय संस्थांना तसे सरकारनं आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार राज्याच्या विधी व न्याय विभागानं हे आदेश जारी केलेत. 


आदेशाचे पालन करण्याचे देवस्थान व धर्मादाय संस्थांना बंधनकारक करण्यात आलं आहे. देवस्थानांमार्फत काळा पैसा पांढरा होण्याची सरकारला भीती असल्याने हे आदेश जारी केलेत. 


नोटांवरील बंदीनंतर सर्वसामान्य नागरिकांचे  दैनदिन व्यवहार ठप्प झालेत. अर्थ चक्राला पुन्हा चालना देण्यासाठी सरकारने देवस्थानाच्या दानपेटीत येणारी रक्कम रोजच्या रोज बँकेत भरण्याचा आदेश दिलाय.


सरकारी आदेश उपयुक्त असला तरी दररोज हा खटाटोप करणं देवस्थानला गैरसोयीचं वाटतोय. सरकरी आदेशानुसार दररोज दानपेटी रिकामी कार्याला आलेला पैसा बँकेत जमा करायला मनुष्यबळ कसे उभे करायचं? असा प्रश्न उपस्थित केला जात असून इतर पर्यायांचा शोध घेतला जातोय.