ताजमहालाला पण नोटाबंदीचा फटका
नोटाबंदी निर्णयाचा फटका सराफ, व्यापारी, शेअर बाजारांबरोबरच देशातील पर्यटन स्थळांना देखील बसला आहे.
नवी दिल्ली: नोटाबंदी निर्णयाचा फटका सराफ, व्यापारी, शेअर बाजारांबरोबरच देशातील पर्यटन स्थळांना देखील बसला आहे.
नोटाबंदीमुळे देशातील सुप्रसिद्ध वास्तू ताजमहाल पाहायला येणाऱ्या विदेशी पर्यटांच्या संख्येत मोठ्याप्रमाणात घसरण झाली आहे.
ताजमहाल पाहायला येणारे परदेशी पाहुणे नोटाबंदीला हैराण होऊन ताजमहालकडे पाठ फिरवली आहे.
परदेशी पर्यटकांचे स्पष्ट मत आहे की, आमचे सुट्टीचे दिवस आम्ही एटीएमच्या रांगेत उभे राहून वाया घालऊ शकत नाही. परंतु काही पर्यटक बँक आणि एटीएमच्या रांगांमध्ये तासनतास उभे आहेत.
नोव्हेंबर २०१५ च्या आकडेवार पाहिली असता, नोव्हेंबर २०१६ मध्ये ताजमहालला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटाकांची संख्या अर्धी आहे.
नोटाबंदीनंतर देशातील नागरिक एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगा लावून उभे आहेत परंतु परदेशी पर्यटक कोणत्याही परिस्थित रांगांमध्ये उभे राहण्यास तयार नाही आहेत. त्यामुळे आग्रातील ताजमहाल आणि अन्य ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांनी भारतात येण्याच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत.
आग्रा पर्यटन विकास फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप अरोडा यांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे देश परदेशातील ७० टक्के पर्यटकांनी आग्रास येण्याचे प्लॅन पुढे ढकलले आहेत किंवा रद्द केले आहेत. त्यामुळे हॉटेल बुकिंग दरवर्षीपेक्षा ३० टक्क्यांनी घसरली आहे.