मरीना बीचवर शेकडो `अम्मा` भक्तांचं मुंडन
तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झालाय.
चेन्नई : तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुक पक्षाच्या कार्यकर्त्यांना शोक अनावर झालाय.
शेकडो महिला आणि हजारो कार्यकर्त्यांनी काल त्यांच्या अंत्य संस्काराला हजेरी लावली. आज सकाळी चेन्नईच्या मरीना बीचवर शेकडो अम्मा भक्तांनी मुंडन करुन आपली आदरांजली व्यक्त केली. त्यात अनेक महिला समर्थकांचाही समावेश आहे.
आजही मरिना बीचवर अनेक समर्थकांनी जयललितांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली.