नवी दिल्ली : ही बातमी दिव्यांगांसाठी महत्वाची आहे. दिव्यांग व्यक्तींना सिनेमागृहातील राष्ट्रगीताला उभं राहण्यासपासून वगळण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याशिवाय सेलिब्रल पाल्सी, पार्किंसन, मेंदूचे इतर आजार, दृष्टीहिनता, बहिरेपणा अशा वेगवेगळ्या व्यंग आणि आजारांनी ग्रस्त असणाऱ्यांनाही ही सवलत देण्यात आलीय असं सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. 


पण इतर नागरिकांना मात्र राष्ट्रगीताचा आदर राखणं बंधनकारक करायाला हवा असंही अतिरिक्त सॉलिसटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं आहे.