हवाई सुंदरी आणि रेलसुंदरीत फरक काय?
तुम्ही दिल्ली-आग्रा प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा प्रवास रेल सुंदरी आणखीन उत्साहपूर्ण करणार आहेत. तुमचं फुलांचा गुच्छ देऊन स्वागत होईल आणि रेल्वेत मंद आवाजात संगीताचे सुरेल सूरही तुमच्या कानी पडतील.
नवी दिल्ली : तुम्ही दिल्ली-आग्रा प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमचा प्रवास रेल सुंदरी आणखीन उत्साहपूर्ण करणार आहेत. तुमचं फुलांचा गुच्छ देऊन स्वागत होईल आणि रेल्वेत मंद आवाजात संगीताचे सुरेल सूरही तुमच्या कानी पडतील.
भारतात दिल्ली आग्रा ही गतिमान एक्र्स्प्रेस सुरू करण्यात आली आहे, या गाडीचा वेग ताशी १६० किमी असणार आहे, ही भारतातील सर्वात जलद धावणारी ट्रेन आहे.
या गाडीत रेलसुंदरी असणार आहेत, पण या हवाई सुंदरी पेक्षा जरा हटके आहेत. गतिमान एक्स्प्रेसमध्ये प्रवेश केल्यावर स्मित हास्यकरून हा रेल सुंदरी तुमचं स्वागत करतात.
रेलसुंदरी तुम्हाला गतिमान एक्स्प्रेसमध्ये विमानासारखं खाण्याचे पदार्थ देऊ करतात. हवाई सुंदरीप्रमाणे या देखील इंग्रजी आणि हिंदी व्यवस्थित बोलतात. दोन्ही सुंदरींना एकाच प्रकारचं प्रशिक्षण असतं.
फक्त रेलसुंदरी या एका खासगी एजन्सीकडून आलेल्या असतात, तर हवाईसुंदरी या संबंधित विमान कंपनीच्या कर्मचारी असतात.