नवी दिल्ली : भारतीय रेल्वेचे हाय स्पीडचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. हे स्वप्न स्पॅनिश कंपनी तालगोने पूर्ण केलंय. या ट्रेनमध्ये भारतीय रेल्वेप्रमाणे जास्त एव्हरेज नाही, त्यामुळे ही ट्रेन अधिक स्पीडमध्ये राहू शकते.


तालगो ट्रेन नेमकी कशी आहे जाणून घ्या...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- तालगोने या ट्रेनचे डब्बे हे भारतीय पद्धतीने केले आहेत. तसेच याचे रॅक बाहेरुन मागवले असून ते भारतात जोडले आहेत.


- ट्रेनमधील डब्बे हे १६० ते २०० किमी प्रति तास अशा वेगाने असणार आहे. हे उपलब्ध असलेल्या ट्रॅकवर दोन रुट्समध्ये धावतील. तसेच हा रूट राजधानी एक्सप्रेसचा असेल म्हणजे दिल्ली- मुंबई असा या प्रवासाचा मार्ग असेल.


किती तासात प्रवास?


- रेल्वे मंत्री सुरेश मंत्री यांनी सांगितले की, तालगो कोचेसमुळे दिल्ली मुंबई प्रवासातील ५ तास कमी होणार आहेत.


- या ट्रेनचा प्रवास हा १६० ते २०० किमी प्रति तास असणार आहे. त्यामुळे दिल्ली ते मुंबई प्रवास हा १७ तासांवरुन १२ तासांवर येणार आहे.


कोणता बदल केला :


-या ट्रेनची ट्रायल घेतली तेव्हा असे समजले की, या ट्रेनमध्ये फार कमी बदल करण्यात आले आहेत. तालगो ट्रेन्स वेगवेगळ्या देशांमध्ये धावत आहे. आशियात आणि अमेरिकेत ही ट्रेन धावताना दिसते.


-तालगो ट्रेन ३०% एनर्जी कमी करणार आहे. त्यामुळे बिल देखील कमी करण्यास मदत करणार आहे.


-त्याचप्रमाणे या तालगो ट्रेनने प्रवासातील सर्वात मोठा वेळ कमी केला आहे.