बंगळुरु : बातमीतला हा फोटो व्हॉटस अॅपवर दोन दिवसात चांगलाच व्हायरल झालाय. मोदींनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप केल्याची, चर्चा चांगलीच रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र म्हणतात ना, व्हॉटस अॅपवर व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती दिसतात, म्हणूनच सर्वच गोष्टी सत्य नसतात. कर्नाटकच्या कोलारमधील ही घटना आहे.


हे आहे फोटोतलं सत्य


कर्नाटकात या नेत्यांनी ७ नोव्हेंबर रोजी गरिबांना कर्ज देण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं. ही बातमी दुसऱ्या ८ नोव्हेंबर रोजी छापून आली, आणि ८ नोव्हेंबरला सायंकाळी मोदींनी, हजार-पाचशेच्या नोटा बाद करण्याची घोषणा झाली, म्हणजे नोटा बाद करण्याच्या निर्णयाचा आणि या कर्जमेळाव्याचा काहीही संबंध नाही.


या नेत्यांनी कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात प्रत्येकी ३ लाखांचं कर्जवाटप केल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हायरल फोटोत बांगरपेटचे आमदार असलेले काँग्रेसचे नेते एस एन नारायण स्वामी, जिल्हा पंचायत सदस्य महेश,  बँकेचे अध्यक्ष ब्यालहल्ली गोविंद गौडा शेतकऱ्यांना रांगेत नोटांची बंडलं वाटप करत असताना दिसत आहे.


मात्र व्हॉटस अॅपवर ज्या प्रमाणे फिरतंय की, मोदींच्या घोषणेनंतर नेते शेतकऱ्यांना पैसे वाटतायत, तर हे सत्य नाही, हा कर्जवाटप मेळावा होता, आणि तो घोषणेच्या एक दिवस आधीच झाला आहे.