३१ मार्च आधी करा ही कामे अन्यथा वेळ निघून जाईल
१ एप्रिलपासून देशात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे काम पूर्ण करण्यासाठी फक्त शेवटचे २ दिवस बाकी आहेत. तुमचे बाकी असलेले काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला फटका बसू शकतो.
मुंबई : १ एप्रिलपासून देशात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे काम पूर्ण करण्यासाठी फक्त शेवटचे २ दिवस बाकी आहेत. तुमचे बाकी असलेले काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला फटका बसू शकतो.
१ एप्रिलपासून बदलणार टॅक्स संबंधित नियम
३१ मार्चनंतर तुम्ही उशिर केला तर तुम्हाला नुकसान होऊ शकतो. कारण हे काम करण्यासाठी तुम्हाला परत वेळ नाही मिळणार आहे.
सोनं विकण्यासाठी उशीर करु नका
१ एप्रिलपासून सरकारने सोनं विकल्यानंतर पैसे मिळवण्याची मर्यादा २० हजारावरुन १० हजार केली आहे. जर तुम्हाला सोनं विकून रोख रक्कम हवी असेल तर १ एप्रिलपासून फक्त तुम्हाला १० हजार मिळणार आहेत. १ एप्रिलनंतर १० हजारावरची रक्कम बँकेत टाकावे लागणार आहे. म्हणजे एक दिवसात एक व्यक्ती फक्त सोनं विकून १० हजार रुपयेत रोख रक्कमेच्या रुपात मिळवू शकतो. जर सोनाराने जरी वेगवेगळे बिल बनवून पैसे दिले तरी तो आयकर विभागाच्या नजरेत येणार आहे.
बेहिशोबी संपत्ती घोषित करण्याची शेवटची संधी
जर तुमच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आहे तर त्याबाबत माहिती देण्यासाठी सरकारने लोकांना एक संधी दिली आहे. आयकर विभागाने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत ३१ मार्चपर्यंत बेहिशोबी मालमत्तेची माहिती दिल्यास किंवा जाहीर केल्यास त्यांना कोणताही दंड होणार नाही. पण ौ एप्रिलनंतर 137% टक्के दंड लागणार आहे.
वाहनांच्या विमा काढण्यात उशिर केल्यास पडणार भारी
जर तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवता तर ३१ मार्च आधी त्याचा विमा काढून घ्या. १ एप्रिलपासून इंश्योरेंसवर जास्त पैसे लागणार आहेत. १ एप्रिलपासून बाईक, कार या वाहनांचा विमा महागणार आहे. ५० टक्क्यांनी तो वाढण्याची शक्यता आहे.
इनकम टॅक्स रिटर्न फाईल करणे विसरु नका
२०१५-१६ च्या आर्थिक वर्षाचं इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी 31 मार्च 2017 शेवटची तारीख आहे. सगळ्यात आधी काम रिटर्न फाईल करण्याचं करा. त्यानंतर आयकर विभाग तुमची रिटर्न फाईल करण्यासाठी नकार देऊ शकतो. जर तुम्ही 2015-16 चा टॅक्स रिटर्न ३१ मार्चच्या आधी भरता आणि फाईल करणं विसरता तर तुम्हाला ५ हजारापर्यंत दंड बसू शकतो.
आधार-पॅनकार्ड बँकेत जमा करा
३१ मार्च पर्यंत तुम्हाला केवायसी डॉक्यूमेंटमध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड जमा करणे आवश्यक आहे. ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही त्यांनी बँकेत जाऊन फॉर्म 60 जमा करायचं आहे. तुमचा लेटेस्ट फोटो देखील जमा करा यामुळे पुढे तुमच्या खात्यासंबंधित कोणतीही अडचण येणार नाही.
इंटरनेट डेटाचं प्लानिंग
रिलायंस जिओ, एअरटेल, वोडाफोन, आयडिया या सारख्या कंपन्या अनलिमिटेड फ्री डेटा आणि कॉलिंगची ऑफर ३१ मार्चला संपवणार आहेत. त्यामुळे तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल की, तुम्हाला कोणत्या कंपनीची ऑफर घ्यायची आहे आणि कोणती कंपनी काय ऑफर देतेय हे देखील पाहावं लागणार आहे.