सुरत : गुजरातमध्ये एका युवकाचं ब्लड ग्रुप पाहून डॉक्टर हैरान झाले आहेत. कारण त्याचा ब्लड ग्रुप A, B, O, AB यामधल्या एकाही ब्लड ग्रुपला मॅच नाही करत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टरांचं म्हणणं आहे की, जगात कोणत्याही व्यक्तीचा रक्तगट असा नाही आहे. हा युवक कोणत्याही व्यक्तीला रक्तदान नाही करु शकत आणि कोणाचंही रक्त याला देखील चालणार नाही. डॉक्टरांनी या रक्तगटाचं नाव INRA ठेवलं आहे.


INRA मध्ये पहिले २ शब्द इंडिया आणि नंतरचे दोन शब्द युवकाचं नाव म्हणून घेतलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनने या ग्रुपला सर्टिफाईड केलं आहे.
या रक्तगटावर अजून रिसर्च सुरु आहे त्यामुळे या युवकाचं नाव अजून गुप्त ठेवण्यात आलं आहे. जगभरात उपलब्ध असलेल्या सर्व रक्तगटांसोबत डॉक्टरांनी ते जुळवून बघितलं पण ते कोणत्याच रक्तगटासोबत मॅच झालं नाही.


हे रक्त कसं बनलं, कोणत्या बदलामुळे हे वेगळं आहे यावर डॉक्टर अजून संशोधन करत आहेत.