नवी दिल्ली : घरगुती वापरावयाचा गॅस सिलिंडरच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, हा विनाअनुदानित सिलिंडर असून ६१.५० रुपयांनी तो स्वस्त होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेल विपणन कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिल्लीत एक मार्चपासून विनाअनुदानित १४.२ किलोग्रॅमचा घरगुती गॅस सिलिंडर ५७५ रुपयांऐवजी आता ५१३.५० रुपयांना मिळणार आहे. याआधी फेब्रुवारी महिन्यात ११८ रुपयांची घट करण्यात आली होती. तर अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात ९ पैसेनी घट करण्यात आली होती.


तसेच याआधी पेट्रोल किंमतीत ३.०२ रुपयांनी घट करण्यात आली. तर डिझेलमध्ये १.४७ रुपयांनी वाढ करण्यात आली. या महिन्यातील डिझेलची दुसरी दरवाढ आहे.