टोरांटो : एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांना नेतृत्व तसंच मीडिया आणि मनोरंजन विश्वातील भरीव कामगिरीबद्दल ग्लोबल इंडियन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅनडा इंडिया फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. कॅनडाचे नवप्रवर्तक, विज्ञान तथा आर्थिक विकास मंत्री नवदीप बैंस यांनी डॉ. सुभाष चंद्रा यांचा 2016 सीआयएफ चंचलानी ग्लोबल इंडियन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. 


या पुरस्काराअंतर्गत मिळालेली 50 हजार डॉलर्सची रक्कम डॉ. सुभाषचंद्रा यांनी परमार्थ संस्थेला देणार असल्याची घोषणा केली.