नवी दिल्‍ली : एस्‍सेल ग्रुपचे चेअरमेन आणि राज्‍यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात मानहानिचा दावा करत तक्रार दाखल केली आहे. दिल्‍लीच्या पटियाला हाऊस कोर्टात ही तक्रार करण्यात आली आहे. काळ्या पैशांच्या बाबतीत केजरीवाल यांनी डॉ. सुभाष चंद्रा यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली. यावर शुक्रवारी किंवा शनिवार सुनावणी होणार आहे.
 
केजरीवाल यांच्यावर जर आरोप सिद्ध झाले तर त्यांना 2 वर्षाची शिक्षा होऊ शकते. केजरीवाल हे पुन्हा -पुन्हा आपल्या वक्तव्यांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. 


डॉ. सुभाष चंद्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशाच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध करत देशात मोठा घोटाळा सुरु असल्याचं वक्तव्य केलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी यामध्ये देशातील अनेक मोठ्या उद्योगपतींची नावं घेत त्यांच्यावर आरोप केले होते.