नवी दिल्ली : इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक तसेच वक्ते डॉ. झाकीर नाईक हे एनआयएच्या रडारवर आहे. मागील आठवड्यात बांगलादेशातील  २० विदेशी नागरिकांच्या झालेल्या निर्घृण हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर एनआयए नाईक यांच्या भाषणांचा तपास करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्टिसन बेकरीतील या हत्याकांडातील सहभागी पाच बांगलादेशी दहशतवाद्यांपैकी एकाने नाईक यांच्या भाषणाचे अनुसरण केले होते अशी माहिती मिळाल्यानंतर एनआयए हा तपास करत आहे. 


डॉ. झकीर नाईक पुरस्कार मुस्लिमांच्या दहशतवादाचा पुरस्कार करत असल्याची टीका त्यांच्यावर होते. या कारणामुळे त्यांच्यावर इंग्लंड, मलेशिया आणि कॅनडात प्रवेश करण्यास बंदी आहे.