नवी दिल्ली : भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुख्य अतिथी म्हणून अबुधाबीचे राजकुमार मोहम्मद बिन जायेद यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी झालेल्या त्यांच्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं काही केलं ज्यामुळे ते हास्याचे आणि टीकेचे धनी ठरलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी आपल्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळासोबत राजकुमार भारतात दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. बुधवारी नवी दिल्लीतल्या हैदरबाद हाऊसमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधिमंडळाची एक बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी अनेक करांरावर स्वाक्षरी करण्यात आली. 


यावेळी, दोन्ही देशांच्या चर्चेदरम्यान राजकुमार मोहम्मद बिन जायेद बोलत होते... आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेडफोन लावून त्यांचं म्हणणं ऐकत होते... पण महत्त्वाचं म्हणजे, यावेळी राजकुमार अरबी भाषेत बोलत होते... आणि अनुवादक उपस्थित नसल्यानं त्यांचं म्हणणं मोदींना साहजिकच समजत नव्हतं. पण, यामुळे मोदींची मात्र चांगलीच फजिती झाली. 


सुरक्षा कारणास्तव परवानगी न मिळाल्यानं अनुवादकाला इथं पोहचण्यासाठी उशीर झाला होता. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट 2015 मध्ये आखाती देशांचा दौरा केला होता. त्यानंतर भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांचे संबंध सुधारलेत.