तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री पलानीस्वामी
तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील.
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी अण्णा द्रमुकचे विधीमंडळ नेते ई. के. पलानीस्वामी विराजमान होतील. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना सरकारस्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे.
येत्या १५ दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात आले आहे. पलानीस्वामी आज संध्याकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
शशिकला यांनी नेमलेले विधिमंडळ पक्षाचे नेते पलानीस्वामी यांच्या सरकार स्थापनेच्या दाव्यावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी निर्णय घेतल्याने तामिळनाडूमधील राजकीय अस्थिरता संपली आहे.
चार वर्षांपैकी राहिलेला कारावास भोगण्यास शशिकला यांनी तात्काळ बंगळुरू येथील न्यायालयात हजर व्हावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील पलानीस्वामी यांची निवड केली होती.