नवी दिल्ली : रविवारी सायंकाळी दिल्ली आणि जम्मू-काशमीरसह उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भूकंपाची तीव्रता ६.८ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्रबिंदू पाकिस्तानच्या पेशावर भागापासून २४८ किमी दूर होते. 


मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातही भूकंपाचे झटके जाणवले. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी चार वाजून एक मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. 


भूकंपाच्या धक्क्यामुळे दिल्लीत मेट्रो सेवा काही काळ बंद ठेवण्यात आली. देशातील चंदीगड, दिल्ली, गाझियाबाद, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्येही भूकंपाचे झटके जाणवले.