बसपाच्या खात्यात 104 कोटी, मायावती आणि त्यांचा भाऊ अडचणीत
उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलाच अडचणीत आलाय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झाले आहे.
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि त्यांचा भाऊ आनंद कुमार चांगलाच अडचणीत आलाय. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर बसपाच्या खात्यात 104 कोटी रुपये जमा झाल्याचं उघड झाले आहे.
या व्यवहाराची चौकशी ईडीनं सुरू केलीय. तर आनंद कुमार यांच्या खात्यावर आठ नोव्हेंबर नंतर जमा झालेल्या 1 कोटी 4 लाखांच्या रकमेचीही आयकर विभागानं चौकशी सुरू केलीय.
उत्तरप्रदेशात होऊ घातलेल्या निवडणूकीच्या तोंडावर उघड झालेल्या या संशयास्पद व्यवहारांमुळे मायवती एकदम बॅकफूटवर गेल्या आहेत.