नवी दिल्ली : नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचं काम अनेक बँकांमध्ये झालं. अॅक्सिस बँकनंतर आता कोटक महिंद्रा बँकेच्या काही शाखा ईडीच्या रडारवर आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरला ईडीने अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅनेजरवर आरोप आहेत की, त्याने जवळपास ३४ कोटींचा काळापैसा पांढरा केला आहे. मॅनेजरवर आरोप आहे की, त्याने यामागे ३५ टक्के कमिशन घेतलं. सीएच्या मदतीने बनावट कंपन्याच्या नावे पैसा जमा करण्यात आला.


अॅक्सिस बँकेच्या शाखांमध्ये ज्याप्रकारे पैसे जमा केले गेले होते तसं याप्रकरणात नाही घडलं. येथे एका बनावट कंपनीने दुसऱ्या बनावट कंपनीच्या खात्यात आरटीजीएसच्या माध्यामातून पैसा जमा करण्यात आला. कोटक महिंद्रा बँकेत जो फंड जमा केला गेला त्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या नावे डिमांड ड्राफ्ट जारी केला गेला.


सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी जमा केली गेलेली रक्कम मोठ्या व्यापाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले गेले आहेत. शेतीउत्पादनातून हा पैसा आल्याचं दाखवण्यात आला आहे कारण त्यावर वॅट लागत नाही. सध्या या खात्यांची चौकशी होत आहे. यामध्ये बँक मॅनेजर शिवाय अजून कोणलाही अटक झालेली नाही. पण अॅक्सिस प्रमाणे आता कोटक महिंद्रा बँक देखील संशयाच्या घेऱ्यात आली आहे.