नवी दिल्ली : माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे दिल्लीत वस्तीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. खडसे दिल्लीत मोदी परदेश दौऱ्याहून परतण्याच्या एका दिवसाआधी दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ खडसे हे पद गेल्यानंतर मोदींची भेट घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकनाथ खडसे यांची भेट घेतील का? हा देखील एक महत्वाचा प्रश्न आहे.


तसंच खडसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यातल्या भोसरीतील एमआय़डीसीचा भूखंड खरेदी प्रकरणात वादग्रस्त ठरल्यामुळं खडसेंना राजीनामा द्यावा लागला.