नवी दिल्ली : भारतातील अमेरिकन दुतावासाकडून अमेरिकन नागरिकांना इशारा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतात अल कायदाकडून काही महत्वाच्या ठिकाणी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


अमेरिकन नागरिक जे भारतात राहतात, त्यांना अमेरिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. भारतातील धार्मिक स्थळं, तसेच संवेदनशील, अति महत्वाच्या ठिकाणांवर हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे.