जम्मू : सीमेवर दहशतवाद्यांशी लढताना असतोष कुमार यांना वीरमर आले आहे. उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत असतोष कुमार शहीद झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर काश्मीरमधल्या बांदीपोरा भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत असतोष कुमार शहीद झालेत. असतोष कुमार हे 13 राष्ट्रीय रायफल्समध्ये गनर म्हणून कार्यरत होते.मंगळवारी श्रीनगरच्या हाजीन आणि क्रलगुंड भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 4 जवान शहीद झाले होते. त्यांच्यात गनेर असतोष कुमार यांचा समावेश होता. 


विशेष म्हणजे 18 वर्षांपूर्वी कारगिलच्या युद्धात गनेर असतोष कुमार यांचे वडिल हवालदार लालसाहिब यांना पाकिस्तानशी लढताना वीरमरण आलं होतं. आता बरोबर 18 वर्षांनी लालसाहिब यांचे पुत्र असलेल्या गनर असतोष कुमार यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे.