नोकरी सोडल्यानंतर तीन वर्षे मिळणार विमा कवच?
आतापर्यंत नोकरी करत असाल तर तुम्हाला विमा संरक्षण मिळत देण्यात येत होते. मात्र, तुम्ही नोकरी सोडल्यानंतरही तीन वर्षे विमा कवच मिळणार आहे.
नवी दिल्ली : आतापर्यंत नोकरी करत असाल तर तुम्हाला विमा संरक्षण मिळत देण्यात येत होते. मात्र, तुम्ही नोकरी सोडल्यानंतरही तीन वर्षे विमा कवच मिळणार आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांसाठी नोकरी सोडली तरी तीन वर्षे विमा कवच देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. याबाबत आज सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (सीबीटी)ची बैठक होत आहे. या बैठकीत हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
बैठकीतील अजेंठ्यानुसार ईपीएफओ सदस्यांसाठी एंप्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्श्योरेंस (ईडीएलआई)ची सदस्यता नोकरी सुटली तरी तीन वर्षानंतर ऐच्छिक स्वरुपात विमा देण्याचा प्रस्तावर चर्चा होण्याची शक्यता आहे. यासाठी कमी योगदान देणाऱ्यांच्या प्रस्तावाचा विचार होऊ शकतो. मात्र, कर्मचाऱ्यांसाठी मूळ वेतनच्या अर्ध्या टक्के प्रीमिअम या योजनेसाठी द्यावे लागत आहेत.
नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांची सदस्य लाभ समाप्त होतो. याशिवाय ईपीएफओ ज्यांची बंद असलेली खाती यावर व्याज देण्याचा विचार करीत आहे. यात ३६ महिने काहीही योगदान नसलेली खाती. अशा खात्यांवर २०११मध्ये व्याज देणे बंद करण्यात आले होते. या बैठकीत गुंतवणूक करण्याबाबात ५० टक्के वाढवून ६५ टक्के करण्याचा विचार होऊ शकतो.