एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रांनी घेतली राज्यसभेच्या खासदारकीची शपथ
एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी बुधवारी राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली.
नवी दिल्ली : एस्सेल ग्रुपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांनी बुधवारी राज्यसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली. राज्यसभेच्या उपसभापती पीजे कुरियन यांनी आज डॉ. सुभाष चंद्रा यांना शपथ दिली.
डॉ. सुभाष चंद्रा हे राज्यसभेसाठी अपक्ष हरियाणातून खासदार म्हणून निवडले गेले. डॉ. सुभाष चंद्रा यांनी म्हटलं की, मी लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करत आहे. डॉ. चंद्रा यांच्या शपथग्रहण वेळी त्यांचं कुटुंबिय देखील राज्यसभेत उपस्थित होते.