नवी दिल्ली : निवडणुकांसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन पूर्वीइतकीच सुरक्षित असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगानं दिलाय. उत्तर प्रदेशच्या निकालानंतर बसपा अध्यक्षा मायावती आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी EVMमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आरोप बिनबुडाचे असल्याचं आयोगानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. याबाबत अद्याप एकाही पक्षाकडून तक्रार आली नसल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय. बसपानं केलेल्या दाव्याला कोणत्याही विशिष्ट घटनेचा आधार नसल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे.