नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानंतर वेगवेगळ्या न्यूज एजन्सी आणि न्यूज चॅनलनं एक्झिट पोल प्रसिद्ध केले आहेत. या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचंच पुन्हा सरकार येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 मे ला या पाचही राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. आसाममध्ये जर भाजपचं सरकार आलं तर नॉर्थ इस्टमध्ये कमळानं जोरदार एन्ट्री घेतल्याचं म्हणावं लागेल. 


आसाम (एकूण जागा- 126)


आज तक आणि ऍक्सिसचा एक्झिट पोल


भाजप - 79 ते 93 जागा


काँग्रेस- 26 ते 33 जागा


एआययूडीएफ- 6 ते 10 जागा


इतर- 1 ते 4 जागा


पश्चिम बंगाल (एकूण जागा- 294)


इंडिया टीव्ही- सी व्होटरचा एक्झिट पोल


भाजप- 2 ते 6 जागा


टीएमसी- 163 ते 171 जागा


लेफ्ट-काँग्रेस- 71 ते 79 जागा


इतर- 1 ते 5 जागा


आज तक आणि ऍक्सिसचा एक्झिट पोल


भाजप- 1 ते 5 जागा


लेफ्ट-काँग्रेस- 38 ते 51 जागा


टीएमसी- 233 ते 253 जागा


तामिळनाडू (एकूण जागा- 232)


आज तक आणि ऍक्सिसचा एक्झिट पोल


एआयडीएमके- 89 ते 101 जागा


डीएमके- 124 ते 140 जागा


बीजेपी- 0 ते 3 जागा


इतर- 4 ते 8 जागा


केरळ (एकूण जागा- 140)


आज तक आणि ऍक्सिसचा एक्झिट पोल


एलडीएफ- 88 ते 101 जागा


यूडीएफ- 38 ते 48 जागा


भाजप- 0 ते 3 जागा


इतर- 1 ते 4 जागा


इंडिया टीव्ही- सी व्होटरचा एक्झिट पोल


एलडीएफ- 72 ते 82 जागा


यूडीएफ- 54 ते 62 जागा


एनडीए- 0 ते 4 जागा


इतर- 0 ते 4 जागा